शिवसेना आमदारानं पुन्हा जिंकलं, काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणाला ‘हाच खरा देवमाणूस’

Maharashtra Today

मुंबई : कोरोना (Corona) रुग्णांची हालपेष्ठा न पाहावल्याने स्वत:ची ९० लाखांची एफडी मोडून राजकारण्यांमध्ये अजूनही ‘माणुसकी’ आणि ‘संवेदनशीलता’ शिल्लक आहे, हे दाखवून देणारे कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पुन्हा एकदा सर्वांचे मन जिंकले आहे. विशेष म्हणजे त्यांनी जो धीर दिला तो शिवसैनिकाला नव्हे तर काँग्रेसच्या एका निष्ठावान कार्यकर्त्याला. सध्या त्यांनी एक ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio Clip Viral) झाली आहे. ही ऑडिओ क्लिप एका कट्टर काँग्रेस कार्यकर्ता आणि आमदार संतोष बांगर यांच्यातील झालेल्या संभाषणाची आहे. आमदार बांगर यांच्या कामाने भारावून गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याने त्यांच्याकडे मदत मागितली आणि आमदारसाहेबांनी ज्या प्रकारे धीर दिला ते पाहूनच कार्यकर्त्याच्या तोंडातून बांगर यांच्यासाठी एक शब्द निघाला तो म्हणजे हाच खरा ‘देव माणूस’.

टीव्ही-९ ने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या वडिलांना रेमडेसिवीर इंजेक्शन पाहिजे म्हणून आमदार संतोष बांगर यांना फोन लावला. रात्री १२ वाजताच्या दरम्यान त्याने आमदारसाहेबांना फोन लावला. आमदारसाहेबांनीही दोन रिंगमध्ये फोन उचलला. कार्यकर्त्याने आपली व्यथा आमदारांसमोर मांडली. त्यांनीही अगदी आपुलकीने कार्यकर्त्याला आश्वस्त केलं, वडिलांची विचारपूस केली आणि अजिबातच काळजी करु नका, कसलीही अडचण आली की कधीही फोन करा, असा धीर दिला. आमदारांच्या माणुसकीच्या अनुभवाने कट्टर काँग्रेस कार्यकर्त्याच्या तोंडून साहजिकच शिवसेना आमदारासाठी देवमाणूस शब्द आला.

काय आहे संवाद…?

काँग्रेस कार्यकर्ता : हॅलो साहेब मी गजाजन देशमुख बोलतोय, रात्री तुम्हाला फोन केला होता… वडिलांना कोरोनामुळे तिरुपती लॉन्सला दाखल केलं आत्ता… डॉक्टर सांगत आहेत की रेमडेसिवीर इंजेक्शनची सोय करा, त्यामुळेच तुम्हाला फोन केला होता…

आमदार संतोष बांगर : संध्याकाळपर्यंत आपले इंजेक्शन डॉक्टरपाशीच पोहोचतील. आपण हजार डोस देतोय. संध्याकाळपर्यंत इंजेक्शन डॉक्टरांपर्यंत पोहोचतील…

काँग्रेस कार्यकर्ता : बरं बरं… तुमचे खूप खूप धन्यवाद साहेब…

आमदार संतोष बांगर : काही काळजी करु नका…

काँग्रेस कार्यकर्ता : रात्रीच्या १२ वाजता एका रिंगमध्ये तुम्ही फोन उचलला साहेब… आम्हाला अपेक्षा होती… तुम्ही आमच्या मनामध्ये खूप मोठं घर केलं साहेब…

आमदार संतोष बांगर : धन्यवाद धन्यवाद ….

काँग्रेस कार्यकर्ता : शेवटी माणसाला सोबत काय घेऊन जायचंय… फक्त विश्वास देणारी माणसं हवीत… साहेब मी एकनिष्ठ काँग्रेसचा माणूस आहे, पण तुमच्याकडून अपेक्षा होती, म्हणून तुम्हाला फोन लावला.

आमदार संतोष बांगर : व्वा व्वा व्वा धन्यवाद धन्यवाद….

काँग्रेस कार्यकर्ता :
विजू पाटलांनी मला सांगितलं, साहेबांना फोन लावा, म्हणून तुम्हाला फोन लावला…

आमदार संतोष बांगर : संध्याकाळी जर तुम्हाला नाही भेटले इंजेक्शन तर मला पुन्हा फोन करा…

काँग्रेस कार्यकर्ता : बरं बरं साहेब

आमदार संतोष बांगर : वडिलांचा स्कोअर किती आहे?

काँग्रेस कार्यकर्ता : साहेब ७ आहे

आमदार संतोष बांगर : ठीक आहे, काही अडचण नाही, काळजीचं कारण नाही ७ आहे म्हणजे नॉर्मल आहे…

काँग्रेस कार्यकर्ता : वडिलांचं बायपास झालेलं असल्यामुळे जरा काळजी वाटत होती…

आमदार संतोष बांगर : काही काळजी करु नका, तुम्हाला जे कोणते डोस लागतील, ते जर संध्याकाळपर्यंत नाही मिळाले, तर मी देतो, काही काळजी करु नका…

काँग्रेस कार्यकर्ता : तुमच्यासारखे देवमाणसं भेटली ना सगळ्यांना तर खूप काही चांगलं होईन साहेब…

आमदार संतोष बांगर : चला, काही काळजी करु नका, टेन्शन घेऊ नका

काँग्रेस कार्यकर्ता : साहेब आज कुणी फोन उचलायला तयार नाही…

आमदार संतोष बांगर : तुम्ही मला कधीही फोन करा, फक्त बैठकीत असेल तर राम फोन घेईन…बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button