नितेश राणे यांच्या ‘त्या’ ट्विटला शिवसेनेचे सडेतोड प्रत्युत्तर

Nitesh Rane-Vaibhav Naik

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार झाल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मालवणी भाषेत ट्विट करत अनिल परबांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर राणे कुटुंबापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने आव्हान निर्माण करणारे शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी मालवणी भाषेतच पलटवार केला आहे.

इज्जत जाऊ नये असे वाटत असेल तर लगेचच राजीनामा देऊन टाका, अशा आशयाचे ट्विट नितेश राणे यांनी मालवणी भाषेतून केले होते. “ओ परबांनू मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका. उगाच उद्या “इज्जत” जावुक नको..! आजच उरलीसुरली “लाज” वाचवा.. आयकतास ना..!!” असे ते ट्विट होते. त्यावर वैभव नाईक यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनीही मालवणीतूनच नितेश यांना प्रत्युत्तर दिले.

वैभव नाईक यांचे मालवणीतील प्रत्युत्तर
“अनिल परब हे मंत्री म्हणून चांगला काम करतहत. उद्धवजींच्या गळ्यातले ते ताईत बनलेहत. त्यांच्यार उद्धवजींचो पूर्ण विश्वास आसा. नितेश राणे आणि निलेश राणे ह्येंका भाजपमध्ये सध्या कोण विचारत नाय. आपणाक भाजपात जावनय कधीच मंत्रिपद मिळाचा नाय ह्या लक्षात इल्यामुळेच ते आता अनिल परबांच्यार आरोप करत सुटलेहत. ह्या आरोपातसून कायच सिद्ध होवचा नाय. अनिल परबांका ह्यापेक्षाय महत्त्वाची खाती मिळतली. म्हणानच अनिल परब हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असल्याचो आमका मोठो अभिमान आसा.” असे नाईक यांनी ट्विट केले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button