TOPS SECURITY प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांचे नाव ; कोणालाही क्लीनचिट नाही

Shiv Sena MLA Pratap Saranaik is not relieved in TOPS SECURITY case

मुंबई : TOPS SECURITY घोटाळा प्रकरणी MMRDA ने कोणालाही क्लीन चीट दिली नाही असा खुलासा MMRDA चे कमिशनर आर. ए. राजीव यांनी केला आहे. TOPS SECURITY घोटाळा प्रकरणी मंगळवारी ED ने MMRDA आयुक्त आर ए राजीव यांची चौकशी केली. तब्बल ९ तास ही चौकशी चालली.

ईडीच्या तपासात टॉप्स सिक्युरीटीला हे कंत्राट मिळवून देण्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sirnaik) यांना अद्याप तरी दिलासा नाहीच असेच म्हणावे लागेल.

तत्पुर्वी MMRDA ने मुंबई पोलिसांच्या EOW या पथकाला लिहिलेल्या पत्रात TOPS SECURITY प्रकरणी कोणताच घोटाळा झाला नव्हता, असं पत्र लिहले होते.याबाबत ईडी चौकशीनंतर इडी कार्यालयाबाहेर पडलेले आर ए राजीव यांना प्रश्न विचारला असता MMRDA ने अशी कोणतीही क्लीनचीट दिली नाही, असं उत्तर राजीव यांनी दिले.

सुत्रांच्या माहितीनुसार ईडीने राजीव यांच्याकडून टॉप्स सिक्युरिटीबीबत इत्यंभूत जाणून घेतले. याबद्दलची सविस्तर माहिती राजीव यांच्याकडून ईडीने घेतली.

MMDRA चे कामकाज कसे चालते? कोण निर्णय घेतात? निर्णय घेण्याची प्रक्रिया काय असते? कोणत्या साली टाॅप्स सिक्युरीटीली कंत्राट देण्यात आले? हे कंत्राट देताना SOP चे पालन केले गेले होते का? कोणत्या आधारे टाॅप्स सिक्युरीटीला कंत्राट देण्यात आले? त्यात कोणत्या अटी शर्ती नमुद करण्यात आल्या होत्या? टाॅप्स सिक्युरीटीला दिल्या गेलेल्या कंत्राटातील SOP चे टाॅप्स सिक्युरीटीने पालन केले आहे का? टाॅप्स सिक्युरीटीला दिल्या गेलेल्या कंत्राटात गैर व्यवहार झाला होता का? गैर व्यवहार झाला असल्यास काय झाला होता? त्यावर MMRDA ने काय कारवाई केली होती? MMRDA ने कारवाई म्हणून काय केले होते? MMRDA ने केलेली कारवाई ही कायदेशीर अटींची पुर्तता करणारी होती का? असे विविध प्रश्न ED ने आर ए राजीव यांना विचारले असून या प्रश्नांची सविस्तर उत्तरे इडीने आर ए राजीव यांच्याकडून घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER