शिवसेना आमदाराची जिद्द; कोरोना रूग्णांसाठी थेट चिकन बिर्याणी, उकडलेली अंडी

Buldhana - Maharashtra Today

बुलडाणा : कोरोनाशी वाचायचं असेल तर मांसाहार करा, असे आवाहन केल्यानंतर वारकरी संप्रदायांच्या रोषाला सामोरे गेलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठा निर्णय घेतला. आपल्यावर होत असलेल्या रोषाकडे दुर्लक्ष करत त्यांनी थेट कोव्हिड रुग्णांना चिकन बिर्याणी आणि उकडलेल्या अंड्यांचे वाटप केले. रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मांसाहार करण्याचा डायट प्लॅन असल्याचं संजय गायकवाड यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

नागरिकांनी रोग प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मांसाहार सेवन करावा, असं म्हणत गायकवाड यांनी आज स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चिकन-बिर्याणी तसेच उकडलेल्या अंड्यांचे वाटप केले. बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत चालली असून सर्व सरकारी कोविड रुग्णालय त्याचबरोबर खाजगी कोविड रुग्णालयांमध्ये मोठ्या संखंने कोरोना रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या महामारीतून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी किमान एक दिवस आड अंडे, मटण, चिकन हे आपल्या आहारात घ्यावे आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना रूग्णांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मांसाहाराचे सेवन करावे असे आवाहन केल्यानंतर वारकरी संप्रदायांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर संजय गायकवाड यांनी त्यांच्या वक्तव्यावरुन ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली. ज्यांची मन दुखावली अशा व्यक्तींची दिलगिरी केली आहे. मात्र, ज्यांनी या विषयाचं राजकारण केले त्यांची माफी मागणार नाही, असं संजय गायकवाड यांनी कडक शब्दात स्पष्ट केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button