आधी कोरोना रूग्णांसाठी मोडली स्वतःची एफडी, आता प्रशासनाला दिला थेट इशारा

Maharashtra Today

बुलढाणा : जिल्ह्यात सध्या रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच रूग्णांना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातही अशाच प्रकार काल घडला. हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना १०८ रुग्णवाहिकेसाठी दोन तास वाट बघावी लागली. ही बाब शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांना माहिती पडताच त्यांचा पारा आणखीनच चढला. त्यांनी रुग्णवाहिका व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले. ‘पुढच्या वीस मिनिटात रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास तुमच्या सर्व गाड्या पेट्रोल ओतून जाळून टाकील’ असा इशारा आमदार बांगर यांनी दिला. दरम्यान आमदारांच्या या इशाऱ्यानंतर तातडीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाची बेले यांच्यासाठी रुग्णवाहिका पाठवून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे. तर दुसरीकडे रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहे. त्यामुळे रूग्णांचे नातेवाईक हतबल होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीरसाठी वणवण फिरत आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी याबाबत संताप व्यक्त करुन राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला आहे. यामुळे रुग्नांच्या मृत्यू संख्येत वाढ होत आहे. याबाबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, एकीकडे रुग्णाचे नातेवाईक इंजेक्शनसाठी वणवण भटकत असताना त्यांना इंजेक्शन मिळत नाही, मात्र दलालांकडे इंजेक्शन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हा मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार असून बाहेरून इंजेक्शन कसे उपलब्ध होतात हे मला हे दाखवा मी माझ्या घरातून एक कोटी रुपये द्यायला तयार आहे. मी इंजेक्शन घेतो व रुग्णांना मोफत वाटतो रुग्णानांचे जीव तरी वाचतील, अशी संतप्त प्रतिक्रिया देत संजय गायकवाड यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button