छत्रपतींचे मावळे म्हणून ही टीका अजिबात सहन करणार नाही ; आंबेडकरांविरोधात शिवसेना मंत्र्यांचा संताप

Shambhuraje desai & Prakash Ambedkar

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी संभाजीराजे (Sambhaji Raje) आणि उदयनराजे (Udayan Raje Bhosle) यांच्यावर टीकास्त्र सोडले . ‘एक राजा बिनडोक’ अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी नाव न घेता उदयनराजेंवर प्रहार केला. आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे . प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा निषेध करत शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी त्यांना इशारा दिला आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर जी टीका केली ती निंदणीय आहे, त्यांची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे. छत्रपती घराणं, त्यांच्या गादीला महाराष्ट्रातील जनता वंदन करत असते. दोन्हीही छत्रपतींनी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. असं असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी छत्रपतींच्या वंशजांवर अशाप्रकारे टीका करणे हे गैर आहे, चुकीचं आहे, आम्ही सातारकर, छत्रपतींचे मावळे म्हणून ही टीका अजिबात सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकरांनी भूमिका मांडावी, मराठा समाज ठामपणे भूमिका मांडून सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला दोन्ही राजेंनी त्यांची भूमिका सरकारकडे ठेवली आहे. सातारच्या गादीचा अवमान कधीही सहन करणार नाही, २०१४ मध्ये खासदार उदयनराजेंवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून आम्ही विधिमंडळाचं सभागृह कामकाज बंद पाडलं होतं, त्यामुळे सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील जनता, छत्रपती घराण्याचे प्रेमी त्यांच्या छत्रपतींच्या वारसावर केलेली टीका सहन करणार नाही असे शंभुराज देसाईंनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER