मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारणाऱ्याला शिवसेनेच्या मंत्र्याने दिल्या शिव्या – आरोप

Abdhul satar

मुंबई : सोशल मीडियात सत्तारांची व्हीडीओ क्लीप प्रचंड व्हायरल होते आहे. भगवान जिरवक नावाच्या या कार्यकर्त्याने अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप केला आहे की, मी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि शेतकरी कर्जमाफीबाबत अब्दुल सत्तारांना प्रश्न विचारला होता. उत्तर देण्याऐवजी सत्तारांनी मला शिव्या दिल्या. मारण्याची धमकी दिली.

भगवान जिरवक म्हणाले की, अब्दुल सत्तार टाकळी जिरवक येथे आले होते. मी त्यांना मराठा आरक्षण आणि शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न विचारला. त्यांनी मला शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या जिवाचे काही बसे – वाईट झाल्यास सर्वस्वी अब्दुल सत्तार जबाबदार राहतील.

व्हीडीओ ‘फेक’ आहे – सत्तार

शिवसेनेचे नेते व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले – तो फेक व्हिडीओ आहे, दोन कार्यकर्त्यांमधील देवाणघेवाण होती त्यावरुन ते सरकारला वेठीस धरु लागले, सरकारने शेतकऱ्यांचे १९ हजार कोटी रुपये कर्ज माफ केले. त्यांच्या अकाऊंटमध्ये १ लाख रुपये दिलेत. मी लोकांशी बोलत असताना त्याने वारंवार अडथळा आणला. प्रत्येक वेळेस अशाप्रकारे काहीतरी घडवायचे हे विरोधकांचे राजकारण आहे.

मुख्यमंत्र्याबाबत कोणी अपशब्द बोलत असेल तर ऐकून घेणार नाही, विरोधकांनी अशा मुलांना दारु पाजून दुसऱ्याच्या सभेत गोंधळ करण्यासाठी पाठवू नये, विरोधक असे करणार असतील तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ. तिथे ९९ टक्के मराठा आहेत, माझे कुटुंब माझी जबाबदारी यासाठी आम्ही त्य़ाठिकाणी गेलो होतो. संपूर्ण गावाने प्रश्न विचारला असता तर नक्कीच उत्तर दिले असते, असे अब्दुल सत्तार म्हणाले. माझ्याबाबत असे पहिल्यांदाच घडले नाही. याआधीही असे प्रकार घडले आहेत. सरकारने याची चौकशी करायला हवी, सत्यता कळेल, असे ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER