शिवसेनेचा उल्लेख वीरप्पन गँग ; वरुण सरदेसाईंची थेट राज ठाकरे कुटुंबावर टीका

Varun Sardesai & Raj Thackeray

मुंबई :- राज ठाकरे (Raj Thackeray) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापासून वेगळे झाले असले तरी आतापर्यंत कधीही राज ठाकरेंवर शिवसेनेने (Shivsena) वैयक्तिक टीका केल्याचे राज्याच्या पाहणीत वा ऐकीवात नाही. याउलट या दोन भावांनी एकत्र यावं अशीच इच्छा तमाम मनसैनिक आणि शिवसैनिकांनी बाळगली. मात्र, आता प्रथमच शिवसेनेकडून राज ठाकरेंवर वैयक्तिक हल्ला झाला आहे.

मनसेची आज मुंबईमध्ये बैठक होत आहे. या बैठकीला राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि सून मिताली ठाकरे (Mitali Thackeray) उपस्थित आहेत. यावर ‘शॅडोचे पण माझे कुटुंब-माझी जबाबदारी’, असं खोचक ट्विट शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केलं आहे.

आज सकाळपासूनच वरुण देसाई यांनी मनसेवर टीका करणाऱ्या ट्विटची मालिका सुरू केली. संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा उल्लेख वीरप्पन गँग असा केला, त्यावर वरुण सरदेसाई यांनी पलटवार करत मनसे खंडणीखोर असल्याची टीका केली.


वरुण सरदेसाई यांच्या या टीकेला पुन्हा संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं. मी वीरप्पनबद्दल बोललो तर वरुणला का झोंबलं, माहिती नाही, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER