शिवसेनेच्या नेत्याची देवेंद्र फडणवीसांशी रत्नागिरीत गुप्त भेट ; निलेश राणेंच्या दाव्याने उलट -सुलट चर्चा

nilesh rane - uday samant - devendra fadnavis - Maharashtra Today

मुंबई :- शिवसेना नेते, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती आहे . रत्नागिरीत सामंत आणि फडणवीसांची गुप्त भेट झाल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु आहे .

तौक्ते चक्रीवादळाची (Cyclone Tauktae) गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही उदय सामंत देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत आले होते. त्या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली, असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे.

तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने रत्नागिरीत (Ratnagiri) येण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button