शिवसेनेतील नेत्यांने मानहानी प्रकरणात पक्षाच्या नगरसेवकाला खेचले न्यायालयात

Manoj Shejwal - Purushottam Barde - Maharashtra Today

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यात शिवसनेतील (Shiv Sena) नेत्यांची धुसफूस शिगेला पोहोचली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे (Purushottam Barde) यांनी आज महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल (Manoj Shejwal) यांच्याविरूद्ध ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी आणि परिवहन सभापती निवडीवरून शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू होती. प्रभारी जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी शिवसेनेचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते यांनी विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना नगरसेवक मनोज शेजवाल यांनी जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांच्याविरोधात २३ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली होती.

आजपर्यंत बरडे यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून शिवसेनेचा आणि पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला आहे. बरडे पक्ष संपवत आहेत. त्यांच्याविषयी मातोश्रीवर गाऱ्हाणे मांडू, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल यांनी दिला होता.
मनोज शेजवाल यांनी केलेले आरोप आणि दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी सोलापूर येथील न्यायालयात शेजवल यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER