शिवसेनेचे नेते दादा भुसे आणि राजन विचारे झाले व्याही-व्याही

Dada Bhuse - Rajan Vichare - Eknath Shinde

मनमाड : शिवसेनेमधील (Shiv Sena) दोन दिग्गज नेत्यांच्या मैत्रीचं रूपांतर आता नात्यामध्ये परिवर्तित झालं आहे. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचा मुलगा आविष्कार आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांची कन्या लतीशा यांचा विवाह आज संपन्न झाला. मालेगावातील आनंद फार्म इथे छोटेखानी सोहळ्यात हा विवाह झाला. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याबाबत अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती.

या विवाह सोहळ्यात निवडक नातेवाइकांव्यतिरिक्त इतर वऱ्हाडी मंडळींना ‘नो एन्ट्री’ देण्यात आली आहे. माध्यमांनाही या सोहळ्यात प्रवेश देण्यात आला नव्हता. ज्या फार्म हाऊसवर हा विवाह सोहळा झाला, त्या फार्म हाऊसच्या गेटवर परवानगीशिवाय आत येऊ नये असा फलक लावण्यात आला होता. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र विशेष अतिथी आणि त्यांच्या वाहनांना परवानगी देण्यात आली.

राज्यातील काही आमदार, खासदार यांच्या गाड्या गेटमधून सोडण्यात आल्या. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी ठेवण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना शुभ आशीर्वाद दिला. तर अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या विवाह सोहळ्यात ऑनलाईन सहभागी होऊन आविष्कार आणि लतीशा यांना आशीर्वाद दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button