रेमडेसिवीर, लसीकरणाबाबत पुरंदर तालुक्याशी दुजाभाव, शिवसेना नेत्याकडून घरचा अहेर

पुणे: राज्यात लसीकरण आणि रेमडेसिवीरवरून (Remedesivir injection) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मात्र आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी ठाकरे सरकारला घरचा अहेर दिला आहे. लसीकरण, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरबाबत पुरंदर तालुक्याशी दुजाभाव होत असल्याचा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे. तसेच रेडेसिवीरच्या तुटवड्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन आणि रेमडेसिवरची तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच लसीकरणही थांबवण्यात आले आहे. त्यामुळे विजय शिवतारे यांनी संतप्त भावना व्यक्त करत थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिवतारे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मी भूमिका घेतलेली नाही. माझी प्रशासकीय कारभारावर नाराजी आहे. तसेच असं शिवतारे यांनी जिल्हाधिकारी आणि एफडीएच्या कारवाईवरही संशय व्यक्त केला.

पुरंदरमध्ये १,८०० कोरोनाचे रुग्ण आहेत. मात्र तालुक्याला केवळ २२५ रेमडेसिवीर इंजक्शन मिळाले आहेत. लसीकरणाबाबतही आमच्यासोबत दुजाभाव झाला. पुरंदरमध्ये कोरोनाच जास्त धोका असताना केवळ ३४ हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र लसीकरणाचा वेग दुपटीचा आहे. प्रशासनाकडे २०० बेडसाठी परवानगी मिळावी असी मागणी करण्यात आली असून ऑक्सिजनचाही तातडीने पुरवठा झाला पाहिजे, असं शिवतारे म्हणाले.

आमच्याकडे इथेनॉल प्लान्ट आहे. त्यात जागा आहे. तिथं ऑक्सिजन प्लान्टची परवानगी दिली. कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत आहे. तालुक्यात औषधांचं मोठ्याप्रमाणावर काळा बाजार सुरू आहे. प्रशासन चांगलं काम करतंय, पण आमच्याकडे दुजाभाव सुरू आहे. मला राजकारणावर बोलायचं नाही. मला आमच्या आमदाराबाबतही काही बोलायचं नाही, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button