उर्मिला मातोंडकर भडकल्या; तीन कोटींचे नवे ऑफिस घेतल्याच्या चर्चांवर दिले स्पष्टीकरण

urmila matondkar

मुंबई : शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी आता नवीन ऑफिस सुरू केलं आहे. या ऑफिसची चर्चा सर्वत्र सुरू आहे. उर्मिला मातोंडकर यांचे नवे कार्यालय लिंकिंग रोड खास वेस्ट परिसरात उभारण्यात आले. हे कार्यालय सहाव्या मजल्यावर असून एक हजार स्वेअर फूट जागेत आहे. या इमारतीत कार्यालयाचं भाडं महिना ५ ते ८ लाख रुपये असल्याची माहिती मिळते. उर्मिला यांचं हे कार्यालय तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांना घेतल्याची माहिती मिळते. मात्र उर्मिलाने यासंदर्भात स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून खुलासा केला आहे .

आपल्या नव्या कार्यालयाबाबत विरोधकांनी आणि काही माध्यमांनी चुकीची माहिती पसरवली. चुकीच्या बातम्या चालवल्याचं स्वत: उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केलाय. त्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात आपण अंधेरीच्या डी.एन. नगर भागातील आपला एक फ्लॅट विकल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याच पैशातून आपण हे कार्यालय खरेदी केल्याचं उर्मिला यांनी स्पष्ट केलंय. तसंच चुकीची माहिती पसरवणाऱ्यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले आहेत.

ही बातमी पण वाचा : किती मूर्ख आहे मी? कंगनाने उर्मिलाला मारला टोमणा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER