वाझेकडून मिळालेल्या महागड्या ‘प्रॅडो’ कारचे मूळ मालक शिवसेना नेते

Maharashtra Today

मुंबई :- मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणात निलंबित झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या प्रॅडो कारचे मूळ मालक शिवसेनेचे (Shiv Sena leader, the original owner of the Prado car) नेते असल्याचे उघड झाले आहे. विजयकुमार भोसले (Vijaykumar Bhosale) असे या शिवसेना नेत्याचे नाव आहे. विजयकुमार भोसले हे मुंबईतील चारकोप विधानसभेचे उपविभाग प्रमुख आहेत. याच गाडीतून स्वतः सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांना सीपी ऑफिसला घेऊन गेल्याचे निषपन्न झाले होते.

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाच्या तपासादरम्यान एमएच – ०२ सी सी ०१०१ क्रमांकाची प्रॅडो गाडी जप्त करण्यात आली आहे. तिची मालकी दोन वर्षांपूर्वी विजयकुमार भोसले यांच्याकडे होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी ही कार विकल्याचा दावा त्यांच्या मुलाने केला आहे. विजयकुमार भोसले यांनी २०१४ मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते भास्कर जाधव यांनी भोसलेंचा पराभव केला होता. गुहागरची हीच जागा २००९ मध्ये शिवसेना नेते रामदास कदम यांनी लढवली होती. त्यावेळी तेही भास्कर जाधव यांच्याकडून पराभूत झाले होते. २०१९ मध्ये स्वतः भास्कर जाधव हेच शिवसेनेत आले आणि निवडून आले.

दरम्यान, विजयकुमार भोसले यांचे पुतणे दीपक भोसले हे अनेक वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सक्रिय होते. मात्र काही दिवसांपूर्वी डोंबिवलीचे मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम यांच्यासोबत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. भोसले यांनी ही प्रॅडो गाडी दोन वर्षांपूर्वी OLX वर विकल्याचा दावा त्यांच्या मुलाने केला आहे. याबाबत आज त्यांना कांदिवली पोलिसांनी जबाब नोंदवायला बोलावलं आहे. मात्र जबाब कांदिवली पोलीस स्टेशनला नोंदवला जाणार की सीपी ऑफिसला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

ही बातमी पण वाचा : सचिन वाझेने पुरावे केले नष्ट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER