‘हेच तर जग विचारतंय…’ भाजप नेत्याचा राऊतांवर पलटवार

Sambit Patra-Shivsena

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही कंगनावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. यानंतर राऊत यांच्यावर विरोधी पक्षाकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी आज एक सूचक ट्विट करत विरोधकांना इशारा दिला आहे . यावर भाजपने (BJP) पलटवार केला आहे .

शिवसेना नेते संजय राऊत यांनी, ‘जय महाराष्ट्र’ असं ट्विट करत शायरी पोस्ट केली आहे. त्यांनी या शायरीतून म्हटले आहे, “मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूं” राऊतांच्या या ट्विटवर भाजपा नेते संबित पात्रा (Sambit Patra) यांनीही पलटवार केला आहे.

पात्रा यांनी ट्विट करत म्हटले आहे, “हेच तर जग विचारतंय… नेमकं ‘हवेली’मध्ये असं काय आहे, की ‘Drugs, Death & Dhoka’ नावाच्या वादळाची दिशा आपण कोणत्याही परिस्थितीत वळवू इच्छिता.” असे ट्विट पात्रा यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : संजय राऊत यांनी माफी मागावी ; दिया मिर्झाने केली कंगना रणौतची पाठराखण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER