महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही; संजय राऊतांनी विरोधकांना खडेबोल

Sanjay Raut

मुंबई :- राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या संकटमय काळात सुरु असलेल्या राजकारणावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay raut) यांनी विरोधकांवर टीका केली आहे. सध्या सगळेच या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला साथ द्या. राजकारण करू नका, असं सांगतानाच संकट ही संधी मानून महाविकास आघाडी राजकारण करत नाही, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला (Sanjay raut taunt bjp over corona crisis) आहे.

राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना विरोधकांना खडेबोल सुनावले आहे. मुंबईसह राज्यात कोरोनावर नियंत्रण येत आहे. त्यामुळे राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्रं येऊन काम करावं. तरच संकटाला तोंड देता येईल. सध्याच्या काळात राजकारण करणं योग्य नाही. राजकारण करण्याची आपली परंपरा नाही आणि सध्याच्या वातावरणात राजकारण करणंही योग्य नाही, असं सांगतानाच महाविकास आघाडी संकट ही संधी मानून कधीच राजकारण करत नाही, असे राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात ऑक्सिजनशिवाय कुणाचाही बळी गेला नाही. उत्तर प्रदेशात, दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. अशाप्रकारचे घाणेरडे आरोप विरोधकांनी करू नये. मी यूपी, बिहार आणि दिल्लीची महाराष्ट्राशी तुलना करत नाही. पण या राज्यांमध्ये जाऊन पाहा, त्या तुलनते महाराष्ट्र निश्चितच चांगलं काम करत आहे, असंही ते म्हणाले.

यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरी सीबीआयने मारलेल्या छाप्यांवरही त्यांनी भाष्य केलं. अशा प्रकारच्या छापेमारी मागे राजकीय षडयंत्र असेल तर आघाडीतील तिन्ही पक्ष त्याचा एकत्रितपणे सामना करतील असेही त्यांनी स्पष्ट केले

मोफत लसीकरण हा सरकारचा विषय आहे. जनतेच्या हिताचा निर्णय सरकार घेईल. कोणत्याही राजकारणाशिवाय हा निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटातून राज्यालाबाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मजबुतीनं काम करत आहेत. विरोधकांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे. रुग्णांचा जीव वाचवणं हे आपले प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ‘शेजाऱ्याला बाळ झाल्यावर तुम्ही पाळणा हालवणार का’, मोफत लसीवरुन खोतांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button