होय, मी लस घेतली, हात दुखतोय म्हणून काळजी घेत आहे : संजय राऊतांची माहिती

Sanjay Raut

मुंबई :- देशात कोरोना (Corona) लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह अनेक नेते, मंत्री, लोकप्रतिनिधींनी कोरोना लस घेतली. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही लस घेतली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली.

संसदेत कोरोना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. आपणही लस टोचून घ्यावी, असा विचार केला आणि लस टोचून घेतली. त्यानंतर आता थोडासा हात दुखतोय. पण ठीक आहे. काळजी घेतोय, असे संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार आपल्याला लॉकडाऊन परवडणार नाही, असे सांगत आहेत. मुंबईकरांनी नियमांचे पालन केले पाहिजे. मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील जनतेने नियम पाळले नाहीत.

मुख्यंत्र्यांनी आवाहन केले आहे की, निर्बंध पाळा. नियम पाळा. मात्र, तसे होताना दिसत नाही. आता लॉकडाऊन टाळणे जनतेच्या हातात आहे. सरकारवर त्याचे खापर फोडता येणार नाही, असे संजय राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचे  करू नये :  संजय राऊत 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER