संजय राठोड राजीनामा देण्याची दाट शक्यता; शिवसेनेत दोन गट

Shivsena-Sanjay Rathore

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja chavan) आत्महत्याप्रकरणात विरोधकांनी वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathore) यांना चांगलेच घेरले आहे . यापार्श्वभूमीवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येत आहे. येत्या गुरुवारी पोहरादेवी येथे ते आपल्या राजीनाम्याची घोषणा करतील, असे सांगितले जात आहे. मात्र, यावरुन शिवसेनेतील (Shivsena) नेत्यांमध्येच दोन गट पडले आहेत. यापैकी एक गट नैतिकता जपण्यासाठी संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी राजीनामा द्यावा, अशा मताचा आहे. तर दुसरा गट संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये, असे म्हणत आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या सगळ्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

शिवसेनेतील एक गट संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, या मताचा आहे. नैतिकतेचा भाग म्हणून संजय राठोड यांनी राजीनामा देण्याची गरज आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण समोर आल्यापासून संजय राठोड एकदाही प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. ते नॉट रिचेबल आहेत. या सगळ्याचा फटका शिवसेनेच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला संजय राठोड यांनी राजीनामा देणे योग्य ठरेल, असे शिवसेनेतील काही नेत्यांचे म्हणणे आहे.

पूजा चव्हाण प्रकरणाची सखोल आणि व्यवस्थित चौकशी होऊन सत्य लोकांसमोर येईल. त्यानंतर गरज पडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांची ही भूमिका म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी हे प्रकरण सातत्याने लावून धरले आहे. त्यामुळे शिवसेनेवर संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याचा दबाव वाढत आहे.

ही बातमी पण वाचा : पूजा चव्हाण आत्महत्या : संजय राठोड ‘या’ ठिकाणी मांडणार आपली बाजू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER