पुरावे सादर करा, नाही तर तोंड काळं करा; शिवसेना नेत्याचे सोमय्यांना आव्हान

Kirit Somaiya-Ravindra Waikar

मुंबई :- भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि कुटुंबीयांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी त्यांना खुले प्रतिआव्हान दिले आहे. ‘पुरावे सादर करा नाही तर तोंड काळं करा!’ असे म्हणत ‘ना घर का, ना घाट का’, अशी सोमय्यांची अवस्था झाल्याचे वायकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे.

ही बातमी पण वाचा : एकदा किरीट सोमय्यांच्या आरोपांची मालिका संपू द्या, दिवाळीनंतर आम्ही सुरु करु: शिवसेना

मुरुड येथील कोलई गावात जमिनी खरेदी झाली होती. हा व्यवहार कायदेशीर पद्धतीने झाला होता. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात याचा उल्लेख केलेला आहे. आयकर विभागालादेखील याचे दस्तऐवज दिले आहे. याशिवाय या प्रकरणाची लोकायुक्तांमार्फत चौकशी झालेली आहे. विरोधकांना आणखी चौकशी करायची असेल तर ते करू शकतात, असे आव्हान वायकर यांनी दिले. अन्वय नाईक यांनी जमीन विकल्यापेक्षा त्यांनी आत्महत्या कोणामुळे केली याचा शोध घेतला पाहिजे. अर्णव गोस्वामी प्रकरण विरोधकांच्या विशेषत: भाजपच्या अंगाशी आल्याने वाचाळवीर किरीट सोमय्या नसती उठाठेव करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना दिली जाहीर ‘वॉर्निंग’

‘रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) यांनी जमिनीबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, २०१४ साली जमिनीचा व्यवहार करण्यात आला. हा व्यवहार नियमानुसारच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आमचा व्यवहार फक्त अन्वय नाईकांसोबत झाला आहे. आता या व्यवहाराला सहा वर्षे  पूर्ण झाली आहेत. मात्र, अद्याप याबाबत किरीट सोमय्या काही बोलले नव्हते. ज्या वेळी रिपब्लिकचे सर्वेसर्वा अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राजकारण करत हे मुद्दे समोर आणले. त्यांच्याकडे ३० जणांसोबत व्यवहार झाल्याचे पुरावे असल्यास सोमय्यांनी ते सिद्ध करावे, असे खुले प्रतिआव्हान वायकरांनी किरीट सोमय्यांना केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER