इंदूरमध्ये शिवसेना नेत्याची गोळ्या घालून हत्या

Ramesh Sahu

इंदूर : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमध्ये (Indore) शिवसेना (Indore) नेते आणि ढाबाचालक रमेश साहू (Ramesh Sahu) यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येमुळे इंदूर शहरात मोठी खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही.

इंदूरच्या तेजाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरीखेडा येथे ढाबा चालवणारे आणि शिवसेना नेते रमेश साहू यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आज, बुधवारी रात्री २.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांना या घटनेबाबत माहिती समजल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. साहू हे शिवसेनेचे मध्यप्रदेशातील प्रमुख नेते होते. ढाब्यावरच त्यांची हत्या करण्यात आली. सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली.

ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी सर्वांत आधी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमकी कोणत्या कारणातून हत्या झाली हे तपासानंतरच समोर येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, घटनास्थळाजवळ लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. ढाब्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER