काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत जाण्यास इच्छुक

priyanka Chaturvedi

मुंबई : एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी महाआघाडीत आलबेल असल्याचं दिसून येत असतांनाच आता एकट्या शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून येऊन हातात शिवबंधन बांधणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत जाण्यास इच्छुक आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत आहेत.

राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी उत्सुक असल्याचं म्हटलं जातं. त्यादृष्टीने चतुर्वेदींनी फिल्डिंग लावल्याचीही माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे प्रियंका चतुर्वेदी या पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. चतुर्वेदींनी थेट ‘फील्डिंग’ लावल्याने राज्यसभेच्या एका जागेच्या शर्यतीत त्या पुढे दिसतात.

अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांपेक्षा जुन्या जाणत्या नेत्यांनाच संधी मिळाली पाहिजे असाही पक्षात मतप्रवाह आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांची नावेही चर्चेत आहेत. याशिवाय विधानपरिषदेचे आमदार दिवाकर रावतेही उत्सुक असल्याची चर्चा आहे.

पवारांच्या मतांशी सहमत असणारे ‘भाजपा’वासी राष्ट्रवादीत परतणार – छगन भुजबळ