आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताखाली घडलो , कोणतीही लढाई लढण्यास तयार : संजय राऊत

Kangana Ranaut-Sanjay raut

मुंबई : अभिनेत्री कंगना ऑफिस तोडफोड प्रकरणात मला प्रतिवादी केलं जाणं हे हास्यास्पद आहे. सध्या मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं सुनियोजित षडयंत्र रचले जातंय, असा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी केला.

आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या हाताखाली घडलो आहोत. माझ्या नावावर शेकडो केसेस आहे. आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार आहोत. आम्हाला न्यायालयाची लढाई नवी नाही,असेही राऊत म्हणाले . एबीपी माझा या वाहिनीशी साधलेल्या विशेष संवादात राऊत यांनी अनेक प्रकरणांवर भाष्य केले .

कंगनाचे कार्यालय हे बेकायदेशीर होतं. तिचं बेकायदेशीर बांधकाम तोडलं म्हणून सध्या कांगावा सुरु असल्याची टीकाही राऊत यांनी केली .

दरम्यान बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणुकासाठीच राजीनामा दिला आहे. हे सर्वांनाच अपेक्षित होतं. ही त्यांची राजीनामा देण्याची पहिली वेळ नाहीये. जे लोक महाराष्ट्राला बदनाम करत आहेत ते राजकारणात जातात, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER