शिवसेना नेत्या,महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

Kishori Pednekar

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिलीय. किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केलीय. 22 डिसेंबरला मुंबई महापालिका कार्यालयात असताना धमकी दिली गेली होती.

31 डिसेंबर 2020 रोजी आजाद मैदान पोलीस ठाण्यात FIR क्रमांक. 261 / 2020 अंतर्गत जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पोलीस पुढील तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून किशोरी पेडणेकर सातत्यानं भाजपवरही हल्लाबोल करत होत्या. ईडीच्या चौकशीवरूनही त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. ”ईडी ही आपल्या देशाची महत्त्वाची संस्था आहे. जे काही सत्य आहे ते पारदर्शकपणे जनतेसमोर येईल. आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे असे जनतेचे देखील मत आहे. यामुळे विरोधकांना आयते कोलीत हातात मिळाले आहे. परंतु निश्चितपणे जे सत्य आहे ते बाहेर येईल,” अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली होती.

कोरोनाच्या (Corona) संकटातही त्यांनी यंदा घरी बसून 31 डिसेंबरला रात्री प्रार्थना करा. नवीन वर्षाचं स्वागत करा. मुंबईकर गाईडलाईन पाळत आलेले आहेत. ज्यांना यात राजकारण करायचं आहे. त्यांच्यावर पालिका आणि पोलीस कारवाई करतील,” असा इशाराही दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER