ठाण्यातील बनावट ओळखपत्रांमागे मुंबईतील शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात ; मनसेचा आरोप

मुंबई :- ठाण्यातील या पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये 21 जणांनी बनावट आय कार्ड बनवले होते. मात्र काहींनी लस घेतली होती, त्यांची यादी आहे. या यादीत 17 नावं आहेत, सुपरवाईझर आणि अॅडमीन बनून या लोकांनी बनावट आयकार्ड बनवले आहेत. ओम साई आरोग्य केयर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.

बनावट आयडी कार्ड प्रकरणी त्या कंपनीवर कारवाई होणार नाही, कारण या कंपनीमागे मुंबईतील शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोप मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी केला आहे.

याच ओम साई आरोग्य केअर कंपनीने गेल्या वेळी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दीड लाख रुपये घेऊन बेड दिला होता, तेव्हा देखील डॉक्टरांवर कारवाई झाली, मात्र या कंपनीवर झाली नाही, आताही तेच होते आहे. या अभिनेत्री कंपनीच्या मालकाच्या मैत्रिणी नाहीत, त्या शिवसेना नेत्याच्या मैत्रिणी आहेत, असाही आरोप जाधव यांनी केला. येत्या काळात ठाणे पालिकेत कोविडचे अनेक घोटाळे उघडकीस येणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button