शिवसेना नेत्याने माहितीच्या अधिकारातून केली ३३ लाखांच्या घोटाळ्याची पोलखोल

ShivSena

अहमदनगर :- नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाकाळातदेखील भ्रष्ट मार्गाने काळा कारभार करण्याचा प्रकार सुरूच आहे. नगरचे पूर्वीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरब्बीकर आणि विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या कार्यकाळात सीसीटीव्ही खरेदी घोटाळा झाला आहे. हा घोटाळा शिवसेना नेते गिरीश जाधव यांनी उघडकीस आणला असून असे गैरप्रकार रोखण्यासाठी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे आणि भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी गजाआड गेलेच पाहिजे.  नाही तर काळ सोकावल्याशिवाय राहणार नाही, असे जाधव यांनी नमूद केले आहे.

अधिकारी आणि  सीसीटीव्ही पुरविणारा ठेकेदार यांच्या हातमिळवणीने हा घोटाळा उघडकीस आला आहे. आठपट जास्त दराने सीसीटीव्ही यंत्रणा खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी माहिती अधिकारात याबाबतचे पुरावे गोळा केले. त्यावरून हेच सिद्ध होते आहे की, अवघ्या चार ते पाच  लाख रुपयांना मिळणारी सामग्री कागदोपत्री ३८ लाख रुपये खर्चून बसविण्यात आली. याबाबत जाधव यांनी आरोग्य मंत्रालय, आरोग्य उपसंचालनालय नाशिक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे या घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करावी आणि जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याची नोंद करून त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button