सत्तारांचा राजीनामा ही केवळ अफवा; भेटीनंतर अर्जुन खोतकरांचा दावा

Arjun Khotkar-Abdul Sattar

मुंबई : माझं आणि सत्तारांचं बोलणं झालं आहे. त्यांनी राजीनामा दिला या केवळ अफवा आहेत. त्यांची कोणतीही नाराजी आता नाही. त्यामुळे आता हा विषय संपला आहे. उद्या ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतील, अशी माहिती शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.

सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. ते उद्या दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्र्यांची मातोश्री येथे भेट घेणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचं मी खंडन करतो.

महाविकास आघाडीला पहिला धक्का; अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

उद्या ते सर्व विषयांवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करतील, असंही खोतकर म्हणाले. दरम्यान, आज सकाळपासून शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेट मंत्रिपदासाठी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आले. त्यानंतर सत्तार यांची समजूत काढण्यासाठी म्हणून शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर सत्तार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.