शिवसेच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण

ShivSena Logo

मुंबई :राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे . राजकीय नेत्यांनाही कोरोनाने (Corona) विळखा घातला असून आतापर्यंत अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे . शिवसेनेचे नेते व माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (corona-positive) आला आहे. अर्जुन खोतकर आता मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार आहेत.

अर्जुन खोतकर यांनी स्वत: फेसबूकच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. अखेर कोविडने गाठलंच.. असे सांगत अर्जुन खोतकर यांनी सांगितलं की, ‘लोक संकटात असतांना नेतृत्त्वानं घरात बसून चालत नाही. कोविडचे सर्व नियम पाळून देखील लोकहिताची कामे करतांना अखेर कोविडने मला गाठलेच. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात मी उपचार घेणार असून ईश्वरकृपेने आणि लोकाशीर्वादाने लवकरच यातून बाहेर पडेल. आपल्या सदिच्छा आणि आशीर्वाद हेच माझे बळ आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच राहा-सुरक्षित राहा शासनाच्या निर्देशानाचे सर्वांनी पालन करावे व सुरक्षित रहावे, असे ट्विट खोतकर यांनी केले आहे .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER