भाजपाने देशव्यापी आंदोलनाची हाक दिल्याने शिवसेना नेत्याचा संताप अनावर

priyanka chaturvedi - Maharashtra Today

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराविरोधात भाजपाने ५ मे रोजी देशव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपाच्या आंदोलनावरून टोला लगावला आहे. प्रियंका चतुर्वेदी (priyanka chaturvedi) यांनी भाजपाच्या नियोजित आंदोलनावरून ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. देशाने अजून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव पाहिलेला नाही.  त्यामुळे भाजपानुसार अशा सुपर स्प्रेड धरणे कार्यक्रमांची गरज आहे, नाही का? असा टोला त्यांनी लगावला आहे.

पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू  असून भाजपासहित इतर पक्षांनीही तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. हिंसाचारात ११ जणांचा मृत्यू  झाला असून केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधी सविस्तर अहवाल मागवला आहे. दरम्यान भाजपाने कोरोनासंबंधी नियमांचे पालन करून ५ मे रोजी देशव्यापी आंदोलन केले जाईल, असे जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button