एकविरा देवी संस्थानचे अध्यक्ष शिवसेनेचे नेते अनंत तरे यांचे निधन

ठाणे : ठाणे (Thane) शहराचे तीन वेळा महापौर राहिलेले माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे (Anant Tare) यांचे आज आज निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मंगळवारी दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

1993,1994 आणि1995 तसे तीन वर्षे ते ठाण्याचे महापौर होते.1998 आणि 1999 मध्ये ते रायगड मतदार संघातून शिवसेनेचे लोकसभा उमेदवार होते मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. सन 2000 मध्ये शिवसेनेने (Shiv Sena) त्यांना विधान परिषदेवर संधी दिली.ते सहा वर्षे आमदार होते.

2014 विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून त्यांना डावलून काँग्रेसमधून (Congress) शिवसेनेत आलेले नारायण राणे (Narayan Rane) समर्थक रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांना उमेदवारी दिल्याने थेट शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करत. कोपरी -पाचपांखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवत तरे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला पण अवघ्या 24 तासात मातोश्रीवर बोलवून घेत पक्षप्रमुख उध्द्वव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांची नाराजी दूर केल्यावर उमेदवारी मागे घेत ते पुन्हा शिवसेनेत कार्यरत झाले.

ठाकरे परिवाराचे कुलदैवत असलेल्या कार्ला येथील एकवीरा देवी संस्थानचे अनंत  तरे हे अध्यक्ष होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER