‘प्यार किया तो डरना क्या’? शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तारांकडून धनंजय मुंडेंचा बचाव

dhananjay munde & abdul sattar

जालना : राज्य सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे अडचणीत सापडले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता विरोधी पक्षही या संधीचा फायदा घेण्यासाठी सरसावला असून भाजपनं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र अशा परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने (Shivsena) मात्र धनंजय मुंडे यांचा बचाव करण्याची भूमिका घेतली आहे. प्यार किया तो डरना क्या…, असे म्हणत शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, संबंधित महिलेसोबतच्या संबंधांबाबत धनंजय मुडे यांनी सोशल मीडियावरून खुलासा केला आहे. दोघांच्या संमतीने असलेल्या संबंधांची त्यांनी कबुली दिली आहे. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना उद्देशून काढलेल्या उदगारांचीही आठवण काढली आणि प्यार किया तो डरना क्या, असे बाळासाहेब तेव्हा म्हणाले होते. तसेच भाजपाच्या अनेक नेत्यांनीही निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रामध्ये माहिती दडवली होती. अशा नेत्यांची नावे आपण लवकरच जाहीर करू, असा इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER