कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करा ; शिवसेना आयटी सेलची मागणी

shiv-sena IT cell demand against-kangana-ranaut

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कंगनावर टीका केल्यानंतर शिवसेनेच्या आयटी सेलने कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या आयटी सेलने ठाणे जिल्ह्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे म्हटले आहे. असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आली आहे. कंगनाने नुकतेच ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तिने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे.

आधी मुंबईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’ असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला . यावरून कंगना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात वादंग पेटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER