अवघी शिवसेना इटालियन काँग्रेसच्या मांडीवर खेळते आहे; अतुल भातखळकर यांची टीका

Atul Bhatkhalkar - Shiv Sena

मुंबई : . … भाजपावाल्यांना (BJP) सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागली आहे. या शिवसेनेने केलेल्या टीकेला भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी उत्तर दिले – अवघी शिवसेना (Shiv Sena) इटालियन काँग्रेसच्या (Congress) मांडीवर खेळते आहे. पत्रकार अर्णब गोस्वामीला (Arnab Goswami) झालेल्या अटकेचा भाजपा विरोध करते आहे.

यावरून सामनामधून शिवसेनेने भाजपावर टीका केली. महाराष्ट्राच्या भाजपावाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत. पण भाजपावाल्यांना सवतीची पोरं  मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागली आहे. मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे त्यांचे धोरण स्पष्ट आहे. अर्णब आसामी आहे. याला भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून उत्तर दिले – अवघी शिवसेना इटालियन काँग्रेसच्या मांडीवर खेळते आहे. राज्यसभेचे उमेदवार म्हणून शिवसेनेने किती सवतीची पोरं  मांडीवर खेळवली? कन्हैयाकुमार, हार्दिक पटेल, अबू आझमी अशा हिंदुत्वद्रोह्यांना मांडीवर खेळवायचा नवा शौक शिवसेनेला जडला आहे. गोस्वामी यांनी टिळक-आगरकरांप्रमाणे सरकारविरोधात जहाल लिखाण केले.

त्यामुळे सरकारने त्यांची गचांडी पकडली असे काही हे प्रकरण नाही. दोन वर्षांपूर्वी अलिबाग निवासी अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्येशी संबंधित ही अटक आहे. नाईक यांनी मृत्यूपूर्वी जे पत्र लिहिलं त्यात गोस्वामी यांच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहाराचा, फसवणुकीचा संदर्भ आहे. त्याच तणावातून नाईक व त्यांच्या आईने आत्महत्या केली. पण आधीच्या सरकारने गोस्वामी यांना वाचवण्यासाठी हे सर्व प्रकरण दडपले. त्यासाठी पोलीस व न्यायालयावर दबाव आणला. आपल्या पतीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करावी असा अर्ज नाईक यांच्या पत्नीने पोलीस व न्यायालयासमोर केल्यावर कायद्याने जे व्हायचे तेच झाले आहे. गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता चौकशीत काय ते सत्य बाहेर येईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER