शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नाही; देवेंद्र फडणवीस यांचा टोमणा

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

पुणे : ‘स्वत:च्या अंगावर आले, की दुसऱ्याला द्रोही म्हणायचे. कोणाच्या म्हणण्याने आम्ही ‘महाराष्ट्रद्रोही’ होत नाही. जनता आमच्या पाठीशी आहे. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नाही, हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजून घ्यावे.’ असा टोमणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला (Shiv Sena) मारला.

ते पुणे विभाग पदवीधरचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख (Sangram Singh Deshmukh) आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपा पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते. पत्रपरिषद घेतली. म्हणाले – आम्हीही महाराष्ट्रातले असून, आमच्या पाच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राला पहिल्या स्थानावर आणले याचा मला अभिमान आहे. राज्य सरकारबाबत आज मोठा असंतोष आहे. कोरोना काळात निष्क्रियता, दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही आणि अतिवृष्टीतील नुकसान झालेल्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. काही ठिकाणी तर पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी आहेत. वीज बिलाच्या सवलतीबाबत घूमजाव केले. त्यावरून सरकारमध्ये समन्वय नाही, त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात सामान्य जनता भरडली जाते आहे.

सरकारच्या वेळकाढूपणामुळे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यास उशीर होतो आहे. सर्व प्रक्रिया थांबली असून, त्याचा फटका मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबत अन्य समाजातील विद्यार्थ्यांना बसला आहे. आता थांबता येणार नाही. त्याच वेळी मराठा समाजाला कुठे स्थान देणार हेदेखील स्पष्ट झाले पाहिजे, असे फडणवीस म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER