शिवसेना हा अस्तित्व संपत चाललेला पक्ष- चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil & Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेना हा अस्तित्व संपत चाललेला पक्ष आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात, कोण संजय राऊत? (Sanjay Raut) असे विचारत त्यांनी राऊत दखलपात्र नसल्याचे सूचित केले. महाविकास आघाडीतील पक्षांबाबत पाटील म्हणालेत, सत्ता असा ‘फेविकॉल’ आहे जो चिटकवून ठेवतो.

विविध प्रकारचे अपमान सहन करायला लावतो. राष्ट्रवादी खूप महत्त्व घेते आहे. काँग्रेस असून नसल्यासारखी आहे आणि शिवसेनेचे अस्तित्व संपत चालले आहे. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे ही कुठे तरी वादाची सुरुवात आहे, असं मला वाटत नाही. पदरात काही पाडून घ्यायचं असेल तर नाराजी व्यक्त करायची आणि मग हवं ते मिळालं की नाराजी दूर करायची असा साधारणतः पॅटर्न आहे.

मात्र पहिल्यांदाच सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. त्याचे पुढे काय होते ते पाहावे लागेल, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकात आम्ही एक सीट जिंकली. इतर पाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आहेत. शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. शिवसेना अस्तित्व संपत चाललेला पक्ष आहे, असे ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER