शिवसेना हा विश्वासपात्र पक्ष, राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी शरद पवारांकडून शिवसेनेला प्रशस्तीपत्र

Sharad Pawar-Uddhav Thackeray

मुंबई :- आज राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापनादिवस असून, यानिमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सत्तेत शिवसेनेचे कौतुक करून, शिवसेनेच्या कार्याला प्रशस्तीपत्र देऊन टाकले. कधी विचारही केला नव्हता की, शिवसेनेबरोबर आपण सत्ता स्थापन करु. शिवसेना हा विश्वासपात्र पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल यावर शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार ५ वर्ष नुसतं टिकणार नाही तर लोकांसाठी कामही करणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मोठा विजय प्राप्त करेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला (Shiv Sena is a trusted party).

पुढे पवार म्हणाले, या देशात अनेकांनी पक्ष काढले. काही टिकले काही गायब झाले. पण राष्ट्रवादीचं हे वैशिष्ट्य आहे 22 वर्षांपासून टिकून आहे. पक्षाला मजबूत करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहे. सत्तेत आपण होतो, सत्ता गेल्यावर काही लोक आपल्याला सोडून गेले. पण नवीन लोक तयार झाले. सहकाऱ्यांच्या कष्टानं राष्ट्रवादीने २२ वर्ष पूर्ण केले. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येईल, असं लोकांना कधीच वाटलं नव्हतं. पण आपण एकत्र आलो. पर्याय दिला. लोकांनी हा पर्याय स्वीकारला असून आपली यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. हे आघाडीचं सरकार सामान्यांसाठी चांगले काम करत आहे. कोणी काही म्हणो, इथं आपण वेगळ्या विचारांचं सरकार स्थापन केलं. राजकारणात सतत काम करत राहाणे गरजेचं आहे. सत्ता ही महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडावण्यासाठी सत्ता गरजेची आहे. तीन पक्षाच्या सरकारला लोकांनी स्वीकारलं, लोकांच्या याच विश्वासावर हे सरकार उत्तम सुरु आहे. सत्ता एकाच ठिकाणी राहू नये, एकाच ठिकाणी राहिल्याने सत्ता भ्रष्ट होईल, असं पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस समोरासमोर, ‘मातोश्री’कडे तक्रार

ओबीसी असो किंवा मराठा आरक्षण (Maratha Reservation), हे प्रश्न सोडवावेच लागतील. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) पुढाकार घेतला. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकांतात भेटल्याने त्यावरून अनेक वावड्या उठवण्यात आल्या होत्या. त्याचं खंडन करत पवारांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री-पंतप्रधान एकांतात भेटले. त्यामुळे काही लोकांनी अनेक तर्कवितर्क लढवले. शंका उपस्थित केल्या. पण शंका उपस्थित करणारे वेगळ्या नंदनवनात राहत आहेत. शिवसेना हा विश्वास ठेवण्याजोगी पक्ष आहे. लोकांच्या विश्वासावर हे सरकार उत्तम काम करत आहे. त्यामुळे हे सराकर नुसतं टिकणार नाही तर पाच वर्षे टिकेल, असा विश्वास पवारयांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button