शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar & Shivsena

मुंबई :- राष्ट्रवादीचे (NCP) नेते व मंत्री धंनजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर रेणू शर्मा (Renu Sharma) हिने केलेल्या आरोपांनंतर शिवसेनेने घेतलेल्या निष्क्रिय भूमिकेचा समाचार घेताना भाजपाचे (BJP) नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेला दुतोंडी गांडूळ म्हटले आहे.

भातखळकरांनी धनंजय मुंडे प्रकरण आणि भाजपाचे माजी राज्यसभा खासदार एम. जे. अकबर यांच्यावरील लैंगिक अत्याचाराचे आरोप यांची तुलना केली. शिवसेना अकबर यांच्या प्रकरणावर वेगळी भूमिका घेते आणि मुंडे प्रकरणावर वेगळी, असा आरोप केला. (BJP MLA Atul Bhatkhalkar criticize Shivsena over Dhananjay Munde and M J Akbar Case).

अतुल भातखळकर यांनी ट्विट केले – “शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे. एम. जे. अकबर यांच्यावर आरोप झाले, तेव्हा बोंबाबोंब करणाऱ्या शिवसेनेचे नेते धनंजय मुंडेंसाठी जोरदार बॅटिंग करतायत. या बोटाची थुंकी त्या बोटावर फिरवण्यात शिवसेनेचा हात कोण धरेल?”

ही बातमी पण वाचा : ‘शिवसेना आयत्या बिळावर नागेबा’, चिपी विमानतळाच्या श्रेयावरुन नारायण राणेंची टीका

याआधीही भातखळकरांनी धनंजय मुंडे प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केलेली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी आणि मुलांची माहिती लपवलीय. हा एकप्रकारे निवडणूक प्रक्रिया आणि नियमांची पायमल्ली असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी भातखळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER