शिवसेना हा गोंधळलेला पक्ष : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis And CM uddhav Thackeray

मुंबई : शिवसेना हा एक गोंधळलेला पक्ष आहे .शेती विधेयकावर (Agriculture Bill) ते लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेतात. आमच्यासोबत जेव्हा सत्तेत होते, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका त्यांनी घेतल्या.

शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही,” अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर (Shivsena) टीकास्त्र सोडले .

केंद्राने मंजुरी दिलेल्या कृषी विधेयकाला मुळात शेतकर्‍यांचा विधेयकांना विरोध नाही. त्यांनी तर स्वागतच केले आहे. शेतकर्‍यांच्या आयुष्यात क्रांती करणारी आहेत.

मात्र काही नेते केवळ आपली दुकानदारी चालविण्यासाठी याचा विरोध करीत आहेत,” असेही फडणवीस म्हणाले.

शेतकर्‍यांबद्दल काँग्रेस आणि या विधेयकांना विरोध करणारे पक्ष केवळ राजकारण करीत आहेत. शेतकर्‍यांची दिशाभूल करीत आहेत. 2019 च्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सुद्धा याच सार्‍यांचे आश्वासन देण्यात आले होते. आता केवळ राजकारणासाठी विरोध सुरु आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असं वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावरही फडणवीस सडकून टीका केली. आपल्याच पोलीस अधिकाऱ्यांवर असा अविश्वास दाखवणे योग्य नाही, जर दुसरं कुणी बोलले तर महाराष्ट्राचा अपमान होतो’ असा टोला फडणवीसांनी देशमुखांना लगावला.

पोलीस हे कुठल्याही पक्षाचे नसता. आम्ही सत्तेवर येण्याआधी 15 वर्ष आघाडी सरकार होते. तेच पोलीस होते, त्याच पोलिसांनी सोबत घेऊन आम्ही उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी त्यांना अधिकार आहे. शेवटी सरकार जे सांगते ते पोलिसांना ऐकावे लागते. त्यानुसार पोलीस काम करत असता. पण काही ठिकाणी त्यांना पूर्ण अधिकार आहे.’ असेही फडणवीस यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER