… मुख्यमंत्रीपदाबाबत महाराष्ट्रात शिवसेनेला शब्द दिलाच नव्हता – भाजपा

Praveen Darekar

मुंबई : मुख्यमंत्री पदाबाबत बिहारमध्ये आम्ही जदयूला शब्द दिला होता तो आम्ही पाळला. महाराष्ट्रात आम्ही शिवसेनेला शब्द दिलाच नव्हता, असे भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, बिहारमध्ये भाजपाने आधीच जाहीर केल होत जदयूचे नेते नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील. भाजपाने दिलेला शब्द पाळला. मात्र महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत कधीही शब्द दिला नव्हता.

बिहारमध्ये आज नितीश कुमार यांचा शपथविधी पार पडतो आहे. सलग चौथ्यांदा ते बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.भाजपाकडून दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER