शिवसेनेतर्फे मात्र निष्ठावंतांच्या पदरी निराशाच; आयात उमेदवारांना विधान परिषदेची संधी ?

Urmila Mantondkar & Chandrkant Raghuvanshi

मुंबई : राज्यपाल नामनिर्देशित १२ जागांसाठी शिवसेनेतर्फे चार उमेदवारांची यादी पाठवण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेतर्फे ऊर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी,नितीन बानगुडे – पाटील आणि विजय अप्पा करंजकर ही चार नावे पाठविण्यात आल्याची माहिती आहे . या यादीवरून निष्ठावंतांच्या पदरी निराशाशाच पडल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीत सध्या तीन पक्ष आहेत. म्हणून प्रत्येकी चार – चार जागा वाट्याला आल्या आहेत. सेनेतर्फे ऊर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, नितीन बानगुडे – पाटील आणि विजय अप्पा करंजकर ही चार नावे पाठवली असल्याची खात्रीलायक बातमी एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

ऊर्मिला मातोंडकर आणि चंद्रकांत रघुवंशी हे कॉंग्रेस पक्षातून आयात केलेले उमेदवार आहेत. तर नितीन बानगुडे – पाटील आणि विजय अप्पा करंजकर हे शिवसेनेचे निष्ठावंत आहेत; पण इतर नावांचीदेखील चर्चा असताना हीच नावे का? असा प्रश्नही सध्या उपस्थितीत करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER