बाळासांहेबांच्या नावावर शिवसेनेकडून खंडणी ; पुरावे सादर करताना मनसे नेत्याचे डोळे पाणावले

मुंबई: शिवसेनेला  (Shivsena) विरप्पन गॅंग असे म्हटल्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांना ते झोंबले मात्र, आज मी पुरावेच घेऊन आलो आहे असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेची पोलखोल केली. शिवसेना कशी खंडणीखोर आहे याचा खुलासा संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी काही पुराव्यासह केल्याचे ते सांगत आहेत.

एवढेच नाही तर या कामासाठीही शिवसेना बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करून घेत आहे याचे आपल्याला अधिक दुःख असल्याचे सांगत असातानाच संदीप देशपांडे यांचे डोळे पाणावल्याचेही पाहायला मिळाले.

संदीप देशपांडे म्हणाले:-

महापालिकेने काही वर्षांपूर्वी हॉकर्स झोन तयार करण्यासाठी सर्व्हे केला होता, मात्र अजूनही ते झालेले नाहीत, या हॉकर्सकडून खंडणी उकळण्याचं काम शिवसेना करत आहे. तसेच चोरी छुपे नाही तर बाळासाहेबांचे फोटो लावून, मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्र्यांचे, आमदारांचे फोटो लावून खंडणी उकळण्याचं काम होत आहे, फेरिवाल्यांना सांगितलं जातं की तुम्ही आम्हाला पैसे द्या, महापालिका तुमच्या गाडीला हात लावणार नाही, पोलिसांना आम्ही मॅनेज करु असे शिवसेनेकडून सांगितले जात असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.तसेच, यातील काही कट उद्धव ठाकरेंना जातो का? असा प्रश्न पडतोय असेही संदीप देशपांडे म्हणाले. शिवसेनेकडून कटाचं राजकारण, तुम्हाला काम करुन घ्यायचं असेल तर आम्हाला कट द्या अशी शिवसेनेची बूमिका असल्याचेही देशपांडे म्हणाले.

शिवसेनेला बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही –

महापालिकेच्या या पावतीवर सार्वजनिक पथ आणि पद वापर करणाऱ्या होणारा उपद्रव कमी करणयासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणारा कर, असं या पावतीवर लिहिण्यात आलं आहे, सगळ्यात जास्त दुख याचं वाटतंय की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे, बाळासाहेबांच्या नावावनर खंडणी उकळणार असाल तर तुम्हाला त्यांचं नाव घेण्याचाही अधिकार नाही ,असं म्हणत असताना संदीप देशपांडे यांच्याा डोळ्यात पाणी आले.

दरम्यान, या खंडणीखोरांना चाप बसला पाहिजे, खंडणीखोरांवर कारवाई व्हायलाय पाहिजे, महानगरपालिकेची लोकं कुणी या खंडणी प्रकरणांमध्ये सामिल आहेत का, याची उच्चपदस्थ झाली पाहिजे अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER