शिवसेनेने हिंदुत्व त्यागले आहे; आता दुटप्पीपणा कशासाठी – भाजप

शिवसेना 'दुटप्पी'; राममंदिर भूमिपूजनावरून भाजपची टीका

ShivSena - BJP

मुंबई : अयोध्या येथील राम मंदिराच्या (Ram Mandir) मुद्दय़ावरून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप भाजपने (BJP) केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंदिर कोरोनाचा नाश करेल का असा प्रश्न केल्यानंतर पवारांच्या आशिर्वादाने सत्तेतील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राममंदिर भूमिपूजन ऑनलाईन करण्याची मागणी केली होती.

ही बातमी पण वाचा : शिवसेना स्वार्थी, अपयशी मग भाजप शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे साधणार?

“आम्ही सर्व धर्म, जाती आणि पंथांचा आदर करतो. पण, महाराष्ट्र सरकार दुटप्पीपणा का दाखवत आहे? जेव्हा भगवान राम मंदिरासाठीची 450 वर्ष जुनी लढाई संपली आहे आणि ऐतिहासिक असा राममंदिर निर्माण सोहळा होतोय तेव्हा महाराष्ट्रातील अनुभवी नेते त्यावर प्रश्न उपस्थित करतात.

महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेने हिंदुत्वाचा त्याग केला आहे. त्यावर त्यांनी मौन बाळगले. हा दुटप्पीपणा का असा प्रश्न भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी उपस्थित केला आहे. तसेच, राम मंदिराचे भूमिपूजन अयोध्येत कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमिवर सामाजिक दुरत्व पाळूनच होणार आहे असेही राम कदम यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER