बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेला शोभेल असे मिळाले चिन्ह

Shivsena

मुंबई :- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला शोभेल असं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. शिवसेनेनं आधीच्या चिन्हावर आक्षेप घेतल्याने निवडणूक आयोगाने ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह दिले आहे. यावर शिवसेनेनं समाधान व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे मध्यप्रदेशात होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (Shivsena) ‘धनुष्यबाण’ या आपल्या पारंपरिक चिन्हासह रिंगणात उतरणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी दिली.

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला निवडणूक आयोगानं सुरुवातीला ‘बिस्किट’ हे चिन्ह दिलं होतं. त्याला शिवसेनेनं आक्षेप घेतला. त्यानंतर शिवसेनेला साजेसं ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह मिळालं आहे. तिकडे मध्यप्रदेशात काँग्रेसच्या २७ आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. तर एका आमदाराच्या मृत्यूमुळे मध्यप्रदेशात २८ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या सर्व जागांवर शिवसेना निवडणूक लढवत भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. मध्यप्रदेश पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून राज्याबाहेर पक्षाची ताकद वाढवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

ही बातमी पण वाचा : शहापूरमध्ये शिवसेनेला खिंडार; शेकडो शिवसैनिक मनसेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER