शिवसेनेमुळेच विरोधी पक्षनेतेपद मिळाले हे लक्षात ठेवा; शिवसेनेचे काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर

yashwant Jadhao & Ravi Raja

मुंबई : मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे. हा वाद कोर्टात प्रलंबित असतानाच आता या पदावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडत आहे. काँग्रेसकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद हे भाजपला देण्यासाठी शिवसेनेचे (Shivsena) प्रयत्न सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. त्याला आता शिवसेनेचे नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांनी प्रत्युत्तर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेमुळेच काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले हे लक्षात ठेवा, अशा इशारा यशवंत जाधवांनी रवी राजांना दिलाय.

जाधव यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हटले की, रवी राजा यांनी जरी शिवसेनेवर आरोप केले असतील, तरी त्यांनी लक्षात घ्यावे की शिवसेनेमुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं. शिवसेनेने मदत केली नसती तर त्यांना हे पद मिळालं नसतं. पण ते आज असे का बोलतात याची मला माहीत नाही, महाविकास आघाडीवर याचे परिणाम होतील, असे म्हणत असतील तर त्यांनी धमकी तर मुळात देऊच नये.

शिवसेना अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही. महाविकास आघाडीवर परिणाम होईल, असं काही मला वाटत नाही. छोटे मोठे मतभेद बसून चर्चेने सोडवले जातील. काँग्रेसने उगाच राईचा पर्वत करून नये, असंही यशवंत जाधव म्हणालेत. दुसरीकडे काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी झडतायत. आता पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद या वादाला कारणीभूत ठरत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER