
मुंबई : शिवसेनेला भजन-किर्तनातून नव्हे तर अजान ऐकण्यातून मनःशांती मिळतेय, अशा शब्दांत भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे नेते आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी शिवसेनेवर (Shivsena) टीका केली . शिवसेना नेत्याकडून अजान स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्यावरुन भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला .
शिवसेनेला आता मंदिरांत घंटा बडवणारा हिंदू नको तर अजान स्पर्धेचं आयोजन करणारा हिंदू हवा आहे. शिवसेना नेत्यांना वेदाच्या शांतिपाठातून, ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगातून आणि भजन-किर्तनातून मनःशांती मिळत नाही तर अजान ऐकण्यातून मिळत आहे.”
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की हिंदुत्व हे काय धोतर आहे का सोडून द्यायला? पण उद्धवजी धोतर तरी कमरेभोवती घट्ट आवळलेलं असतं पण तुमचं हिंदुत्व हे खांद्यावरच्या उपरण्यासारखं होतं, जे तुम्ही एक वर्षापूर्वीच बाजूला काढून ठेवलं. शिवसेनेचे हिंदुत्व हे इतकं तकलादू होतं हे आता महाराष्ट्रासमोर सिद्ध झाल आहे, अशा शब्दांत तुषार भोसले यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले .
दरम्यान भगवदगीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर शिवसेनेने आता अजान पठण स्पर्धेचं आयोजन केलं आहे. मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही स्पर्धा घेण्यात येत असल्याचं सांगतानाच अजानला विरोध करणं चुकीचे असल्याचे मत शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी सांगितले .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला