बिहार निवडणुक ; शिवसेना धनुष्यबाणावरच अडून , बिस्कीट’ चिन्हाला दिला नकार  

Shivsena-Bihar Election

मुंबई : बिहार निवडणुकीत (Bihar Election) शिवसेना  (Shivsena)देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे . 50 जागांवर शिवसेना आपले उमेदवार उतरविणार असून यंदा पक्षाला आपलं आरक्षित चिन्ह धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार नाहीत. वडणूक आयोगाकडून जारी केलेल्या पत्रात दिल्यानुसार निवडणूक चिन्ह ऑर्डर, 1968 च्या परिच्छेद 13 अंतर्गत शिवसेनेला बिहारच्या 50 जागांसाठी मोफत चिन्हांच्या सूचीतील ‘बिस्किट’ निवडणूक चिन्ह (Biscuit symbol) मिळाले आहे. ; शिवसेना धनुष्य बनावरच अडून आहे .

माहितीनुसार धनुष्णबाण चिन्ह नसल्यामुळे निवडणुकीसाठी पक्षाचा उत्साह कमी झाला आहे. शिवसेनेच्या स्थानिक युनिटच्या आग्रहामुळे पार्टीने 50 जागांवर उमेदवार जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या शिवसेना पक्षाला निवडणूक आयोगाने बिहारसाठी बिस्किट हे निवडणूक चिन्ह दिले आहे. ज्यावर शिवसेनेने आक्षेप नोंदवला आहे. बिहार निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उभे करीत आहे. शिवसेनेने धनुष्य-बाणाऐवजी ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलिंडर किंवा बॅट या चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र ही तिन्ही चिन्हे न देता आयोगाने बिस्किट हे चिन्ह शिवसेनेला दिले आहे. यानंतर शिवसेनेने या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी नवीन निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी तीन पर्याय दिले होते. बिहारमध्ये सत्ताधारी दल जेडीयूने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतच शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे निवडणूक चिन्ह परत घेतले होते. शिवसेना आणि जेएमएमचं निवडणूक चिन्ह धनुष्य बाण आहे तर जेडीयूचे चिन्ह बाण आहे, हे विशेष .

ही बातमी पण वाचा : शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांचा बोलविता आणि पैसे पुरवणारा धनी वेगळा : संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER