शिवसेनेने आघाडी धर्म पाळला ; नगरमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली

mahavikas Aghadi

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन केले. अहमदनगर महापालिकेची स्थायी सभापतीपदाची निवडणूक पार पडली आहे.

यादरम्यान राजकारणाला नवे वळण मिळाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेने (Shivsena) आपला युती धर्म पाळत निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.

स्थानिक पातळीवर निवडणुकीतही शिवसेनने मोठ्या मनाने मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला मदत करत पराभव स्वीकारला आहे.

महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची निवड झाली आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी शिवसेनेचे योगीराज गाडे यांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे मनोज कोतकर विजय झाली.विशेष म्हणजे, संख्याबळ जास्त असतानाही शिवसेनेने माघार घेतल्याने सर्वत्र आघाडी धर्म पाळला असल्याची चर्चा आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER