वरळीच्या जागेसाठी शिवसेनेची काँग्रेससोबत फिक्सिंग ; संभाजी पाटलांचा आरोप

Sambhaji Patil Nilangekar - Dhiraj Deshmukh - Aaditya Thackeray

लातूर : 2019 ची विधानसभा अनेक गुढ, रहस्य आणि राजकीय डावपेचांच्या गणितांनी आखलेली होती की काय, जे सर्व घडले त्याची तयारी खूप आधीपासूनच होती की काय अशी शंका अनेक उदाहरणांनी उपस्थित होते. आता तर संभाजी पाटील निलंगेकर यांनी थेट तसा आरोपच शिवसेनेवर केला आहे.

वरळीच्या जागेसाठी शिवसेनेने काँग्रेससोबत फिक्सिंग केल्याचा आरोप संभाजी पाटील निलंगेकरांनी केला. एवढेच नाही तर, विधानसभेआधीच शिवसेनेने (Shiv Sena) काँग्रेससोबत (Congress) आघाडीची तयारी केली होती, असा दावाही त्यांनी केला. विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) लातूर ग्रामीणमधून, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) वरळीतून निवडून यावेत, म्हणून हा करार झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप निलंगेकरांनी केला आहे.

काय म्हणाले संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) –
2014 मध्ये रमेश कराड हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजप उमेदवार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सेना-भाजपची युती होती. कराड यांची उमेदवारी ग्राह्य धरली जात असताना शिवसेनेने या जागेसाठी टोकाचा आग्रह धरला. अखेर युती टिकवण्यासाठी रमेश कराड यांना भाजप (BJP) सोडून शिवसेनेकडून लढवण्याचा निर्णय झाला. त्यांना आम्ही शिवबंधन बांधण्यास सांगितलं, कराड पक्षप्रवेश करणार त्याचवेळी सचिन देशमुख यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली, असा दावा संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.

लातूरमधील स्थानिक स्वराज्य संस्था रमेश कराड यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे लातूर ग्रामीणची जागा कराड यांना सुटणार, हे निश्चित मानलं जात होतं. मात्र जागा मागून घेऊन शिवसेनेने ऐनवेळी सचिन देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. सचिन देशमुख यांना शिवसैनिकही ओळखत नव्हते. त्यामुळे भाजपसोबत युती असताना शिवसेना काँग्रेसला बाय देत आहे का? सेना-काँग्रेसचं आघाडी करण्याविषयी आधीच ठरलं होतं का? भाजपला धोका देण्याचं आधीच ठरलं होतं का? असे प्रश्न निलंगेकरांनी उपस्थित केले. टीव्ही 9 ने हे वृत्त दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER