मुंबई मनपा निवडणुकीच्या काळात शिवसेना, मनसेला गुजराथींच्या प्रेमाचे भरते !

Raju Patil

कल्याण : आरटीओकडून मराठी नंबर प्लेट लावणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली जात असल्याने मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मुख्यमंत्र्यांना गुजराती भाषेत उपरोधिक ट्विट केले.

मुंबई मनपाची निवडणूक लक्षात घेऊन, गुजराथी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने मोहीम सुरू केली आहे. यात ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ या घोषवाक्याने शिवसेनेकडून गुजराती समाजासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. सध्या शिवसेना गुजराथींकडे जास्त लक्ष देते आहे याकडे संकेत करताना, मराठी नंबर प्लेटवरच्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांसाठी पाटील यांनी गुजराथीत ट्विट केले – महाराष्ट्र मा मराठी नंबर प्लेट पर कारवाई थई रही छे, जरा ध्यान आपो. मराठी माणूस आशानी नजरें तमारी तरफ देख रहयो छे.

मुंबई महाराष्ट्राबाबतचा अहंकार मराठीबाबत पण दाखवावा

आमदार राजू पाटील यांनी आज गुजराती समाजाच्या एका संस्थेकडून आयोजित रक्तदान शिबिरात उपस्थित होते. त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी मदत देण्याचे आश्वासनही राजू पाटील यांनी दिले आहे. यामुळे मनसेच्या भूमिकेविषयीही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (MNS MLA Raju Patil participate in Gujrati community blood donation camp)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER