शिवसेना इतरांच्या घरी जन्मलेल्या बाळासाठी मिठाई वाटते; देवेंद्र फडणवीसांची टीका

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray.jpg

मुंबई : शिवसेनेला विधानपरिषद निवडणुकीत काही मिळाले नाही, तरी ते आनंद साजरे करत फिरत आहेत. हे म्हणजे इतरांच्या घरात जन्मलेल्या मुलासाठी स्वतः पेढे वाटण्यासारखे झाले, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shivsena) केली आहे.

राज्यात नुकत्याच विधानपरिषद निवडणुका पार पडल्या . त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीकडे. यात मर्यादित जागा असल्यामुळे आणि तीन पक्षांच्या कारभारामुळे भाजपाला ही निवडणूक सोपी जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला मोठी संधी मिळेल. तसेच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमुळेच भाजपाला (BJP) सहज विजय मिळवता येईल, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान फडणवीस यांनी शरद पवार यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पवार साहेब महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक, राजकीय जडण-घडण समजणारे आहेत. आमचे राजकीय विचार जरी वेगळे असले तरी पवार साहेबांची प्रतिमा ही राजकारणात वेगळी आहे, असे म्हणत फडणवीस यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER