शिवसेना प्रवेश : उर्मिला मातोंडकरने दिला नकार?

urmila matondkar

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondakar) शिवसेनेमध्ये (Shivsena) प्रवेश करणार असल्याचे वृत्त गेल्या एक दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. वृत्ताला शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी दुजोरा दिला होता. दरम्यान, उर्मिला हिने शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळून लावल्याची माहिती आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केली आहे.

शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा ऊर्मिला कडून इन्कार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. उर्मिलाने उद्या संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याचे सांगितले. तुम्ही सर्वजण देत असलेल्या पाठिंब्याबाबत आभार. मी उद्या संध्याकाळी चार वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे. कृपया कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहा, जय महाराष्ट्र, असे ट्विट उर्मिला मातोंडकरने केले आहे.

उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूकही लढवली होती. भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांनी तिचा पराभव केला होता. त्यानंतर त्या काही काळ ती राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर होती. ती काँग्रेसमध्ये नाराज असल्याचेही सांगण्यात येत होते.

नंतर, विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा विषय आल्यानंतर उर्मिला मातोंडकरचे नाव चर्चेत आले. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकरच्या नावाची शिफारस केली. उर्मिलानेही हा प्रस्ताव स्वीकारल्याचे सांगण्यात आले होते.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या पदांसाठी १२ जणांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली आहे. यामध्ये शिवसेनेने उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे-पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी. काँग्रेसने रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वणकर व राष्ट्रवादी काँग्रसने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे यांची नावे दिली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER